नागपूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या ३५ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून विशेषज्ञ पदाकरिता मुलाखत आयोजित करण्यात येत आहे .
विविध पदांच्या एकूण ३५ जागा
औषधनिर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फिजिशियन (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि ईएनटी विशेषज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याची तारीख – दिनांक २५ मे २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग. नागपूर-४४०००१ छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर, पिनकोड- ४४०००१
मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हिल लाईन, नागपुर महानगरपालिका, नागपूर.
मुलाखतीची तारीख – दिनांक २५ मे २०२३ रोजी थेट मुलाखती घेण्यात येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.