महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात कृषी सेवक पदांच्या १४१६ जागा
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापुर, लातूर, नागपूर, नाशिक, पुणे आणि ठाणे यांच्या आस्थापनेवरील कृषीसेवक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कृषी सेवक पदाच्या एकूण १४१६ जागा
अमरावती विभाग २७९ जागा, औरंगाबाद विभाग ११२ जागा, कोल्हापुर विभाग ९७ जागा, लातूर विभाग १६९ जागा, नागपूर विभाग २४९ जागा, नाशिक विभाग ७२ जागा, पुणे विभाग ३१४ जागा आणि ठाणे विभाग १२४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार शासनमान्य संस्था किंवा कृषि विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी १९ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ४००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी २००/- रुपये तसेच दिव्यांग/ माजी सैनिक उमेदवारांना फीस मध्ये पूर्ण सवलत.)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जानेवारी २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.