बृहन्मुंबई महानगरपालिकेमधील अभियांत्रिकी विभागाच्या आस्थापनेवरील दुय्यम अभियंता पदाच्या २९१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

दुय्यम अभियंता (स्थापत्य) पदाच्या १९० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून स्थापत्य किंवा कन्स्ट्रक्शन अभियांत्रिकी मधील पदवी किंवा समतुल्य अर्हता धारण केलेली असावी.

दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) पदाच्या ९२ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून यांत्रिकी विद्युत किंवा ऑटोमोबाईल्स अभियांत्रिकी मधील पदवी / इलेक्ट्रॉनिक्स/ प्रोडक्शन अभियांत्रिकी मधील पदवी किंवा समतुल्य अर्हता धारण केलेली असावी.

दुय्यम अभियंता (वास्तुशास्त्रज्ञ) पदाच्या ९ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून वास्तुशास्त्रातील पदवी धारण केलेली असावी.

वयोमर्यदा – उमेदवाराचे वय २० जानेवारी २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – मुंबई

परीक्षा फीस – खुला प्रवर्ग – ६००/- रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्ग ३००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जानेवारी २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Comments are closed.

     
Visitor Hit Counter