ठाणे आदिवासी विकास विभागात विविध पदांच्या एकूण ४०० जागा

ठाणे आदिवासी विकास विभागाच्या आस्थापनेवरील शिक्षक पदाच्या जागा भरण्यासाठी केवळ ठाणे, पालघर आणि पुणे जिल्ह्यामधील केवळ अनुसूचित जमाती (एस.टी) प्रवर्गातील पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्राथमिक शिक्षक (मराठी/ इंग्रजी) पदाच्या १९३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ४५% गुणांसह बारावी उत्तीर्णसह डी.एड./ डी.टी.एड. (मराठी/ इंग्रजी माध्यम) आणि टीईटी/ सीईटी उत्तीर्ण असावा.

माध्यमिक शिक्षक (मराठी/इंग्रजी) पदाच्या ६३ जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि बी.ए.(इंग्रजी) आणि बी.एड. किंवा बी.एस्सी.बी.एड अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे.

उच्च माध्यमिक शिक्षक पदाच्या एकूण ६१ जागा
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी किमान ४५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि बी.एड. किंवा एम.एस्सी.बी.एड. अर्हता धारण केलेली असणे आवश्यक आहे.

गृहपाल (स्री/पुरुष) पदाच्या ६४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने समाजकार्य/ समाज कल्याण प्रशासन/ आदिवासी कल्याण/ आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी.

ग्रंथपाल पदाच्या एकूण १५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह लायब्ररी सायन्स डिप्लोमा/ ग्रंथालय शास्त्र पदवीधारक असावा.

प्रयोगशाळा सहाय्यक पदाच्या १४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ४३ वर्ष दरम्यान असावे. (अपंग/ माजी सैनिक/ प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी २ वर्ष सवलत आणि खेळाडू/ शासकीय आश्रमशाळेत किमान पाच वर्षाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – ठाणे, पालघर आणि पुणे जिल्हा

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ८००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना ७००/- रुपये आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  १४ जानेवारी २०१९ आहे.

अधिक महिला कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

शिक्षक भरती जाहिरात पहा

गृहपाल भरती जाहिरात पहा

अधीक्षक भारती जाहिरात पहा

ग्रंथपाल भरती जाहिरात पहा

ऑनलाईन अर्ज करा

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});