पश्चिम रेल्वे (मुंबई) मध्ये क्रीडा कोट्यातून विविध पदांच्या ६४ जागा
पश्चिम रेल्वे, मुंबई (Western Railway) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६४ जागा केवळ क्रीडा कोट्यातून भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६४ जागा
गट-क आणि गट-ड (क्रीडा कोटा) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – स्तर- ५/४ करीता उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा. तसेच क्रीडामध्ये (अ) ऑलिंपिक खेळांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व (वरिष्ठ श्रेणी) केलेले असावे किंवा (ब) विश्वचषकात किमान तिसरे स्थान (कनिष्ठ/ युवा/ वरिष्ठ श्रेणी)/ जागतिक चॅम्पियनशिप (कनिष्ठ/ वरिष्ठ श्रेणी)/ आशियाई खेळ (वरिष्ठ श्रेणी)/ राष्ट्रकुल खेळ (वरिष्ठ श्रेणी)/ युवा ऑलिंपिक/ चॅम्पियन्स ट्रॉफी (हॉकी) किंवा थॉमस/ उबर कप (बॅडमिंटन) स्पर्धेत सगभाग घेतलेला असावा.
स्तर- ३/२ करीता उमेदवार हा इय्यता १२ वी (१०+२) किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा मान्यताप्राप्त संस्थेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा मान्यताप्राप्त बोर्ड प्लस कोर्स पूर्ण केलेला (अप्रेंटिसशिप) किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक्युलेशन उत्तीर्ण आणि NCVT/ SCVT द्वारे मान्यताप्राप्त ITI किंवा मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक्युलेशन उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेद्वारे मान्यताप्राप्त डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. तसेच क्रीडामध्ये (अ) विश्वचषकात देशाचे प्रतिनिधित्व केले (कनिष्ठ/ युवा/ वरिष्ठ श्रेणी)/ जागतिक अजिंक्यपद (कनिष्ठ/ वरिष्ठ श्रेणी)/ आशियाई खेळ (वरिष्ठ वर्ग)/ राष्ट्रकुल खेळ (वरिष्ठ श्रेणी)/ युवा ऑलिंपिक/ चॅम्पियन्स ट्रॉफी (हॉकी) किंवा थॉमस/ उबर कप (बॅडमिंटन) किंवा (ब) राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत किमान तिसरे स्थान (कनिष्ठ वरिष्ठ वर्ग/ आशियाई अजिंक्यपद/ आशियाई चषक (कनिष्ठ/ वरिष्ठ श्रेणी)/ दक्षिण आशियाई फेडरेशन गेम्स (वरिष्ठ श्रेणी)/ यूएसआयसी (जागतिक रेल्वे) चॅम्पियनशिप (वरिष्ठ श्रेणी) /जागतिक विद्यापीठ खेळ किंवा (क) वरिष्ठ/ युवा/ कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत किमान तिसरे स्थान किंवा (ड) भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या तत्वाखाली आयोजित राष्ट्रीय खेळांमध्ये किमान तिसरे स्थान किंवा (ई) अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अजिंक्यपद स्पर्धेत किमान तिसरे स्थान आयोजित असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या तत्वाखाली किंवा (एफ) फेडरेशन कप चॅम्पियनशिपमध्ये (वरिष्ठ श्रेणी) प्रथम स्थान मिळविलेले असावे.
स्तर- १ करीता उमेदवार हा इय्यता १० वी किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण किंवा आयटीआय किंवा डिप्लोमा किंवा समतुल्य किंवा एनसीव्हीटी ने दिलेले राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रमाणपत्र (एनएसी) शैक्षणिक पात्रता मान्यताप्राप्त संस्थेतील असणे आवश्यक आहे. तसेच क्रीडामध्ये (अ) कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप (ज्युनियर/ सिनियर) किंवा आशियाई चॅम्पियनशिप/ आशिया कप (ज्युनियर/ सिनियर) किंवा दक्षिण आशियाई फेडरेशन गेम्स (ज्युनियर) किंवा यूएसआयसी (जागतिक रेल्वे) चॅम्पियनशिप (ज्युनियर श्रेणी) किंवा जागतिक विद्यापीठ खेळ किंवा (ब) फेडरेशन कप चॅम्पियनशिपमध्ये (ज्युनियर श्रेणी) किमान तिसरे स्थान किंवा (क) फक्त वरिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये किमान आठवे स्थान मिळवून राज्य किंवा समतुल्य संघाचे प्रतिनिधित्व केलेले असावे.
टीप – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी किमान १८ वर्ष आणि कमाल २५ वर्ष दरम्यान असावे. (दिनांक २ जानेवारी २००१ ते दिनांक १ जानेवारी २००८ (दोन्ही दिवस समाविष्ट करून) दरम्यान जन्मलेले उमेदवारच अर्ज करू शकतात.
परीक्षा शुल्क – अराखीव उमेदवारांसाठी ५००/- (पाचशे रुपये) तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ माजी सैनिक/ दिव्यांग/ महिला/ अल्पसंख्याक/ आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी २५०/- (दोनशे पन्नास रुपये) आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!