‘टीईटी’त लाच घेऊन पास केल्याने तुकाराम सुपेंना पुणे पोलिसांकडून अटक

म्हाडा भरती पेपरफुटी प्रकरणानंतर तपस करत असतानाच पुणे पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) अपात्र झालेल्या उमेदवारांना पैसे घेऊन पास केले असल्याचे समोर आल्याने महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी अटक केली असून त्याच्या घराची घेतलेल्या झडती मध्ये रोख ८८ लाख रुपये जप्त केले आहेत. आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर महेश बोटले यांच्यानंतर आणखी एका वरिष्ठ अधिकाऱ्याला अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आल्याची माहिती पुण्याचे पोलीस उपयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

संपूर्ण बातमी पहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});