ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७७३ जागा
ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १७७३ जागा
गट-क आणि गट-ड संवर्गातील सहायक परवाना निरीक्षक, लिपिक, कनिष्ठ अभियंता, नर्स आणि इतर पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता विषयी संपूर्ण तपशील महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
परीक्षा शुल्क – अमागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी १०००/- रुपये आणि मागास व अनाथ प्रवर्गातील उमेदवारांसाठी ९००/- रुपये तसेच माजी सैनिकांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ सप्टेंबर २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने करता येतील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखाडी, ठाणे (प), पिनकोड- ४०० ६०२
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!