स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ब/ क संवर्गातील पदांच्या भरपूर जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत केंद्र सरकारच्या अधिनस्त विविध मंत्रालये/ विभाग/ संस्थांच्या आस्थापनेवरील गट “ब” आणि गट “क” संवर्गातील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी डिसेंबर- २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा-२०२२ मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा-२०२२
सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी, सहाय्यक विभाग अधिकारी, सहाय्यक, निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी, उपनिरीक्षक, सहाय्यक/ अधीक्षक, विभागीय लेखाकार, उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, लेखा परीक्षक, लेखाकार/ कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक/ वरिष्ठ लिपिक आणि कर सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधारक असणे अवश्यक आहे. (कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी पदांसाठी इय्यता बारावी आणि पदवीत गणित विषयांमध्ये किमान ६०% गुण आवश्यक आहेत.)

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दिनांक १ जानेवारी २०२२ रोजी सहाय्यक व निरीक्षक पदांकरिता १८ ते ३० वर्ष किंवा २० ते ३० वर्ष आणि सहाय्यक विभाग अधिकारी, उपनिरीक्षक पदांकरिता २० ते ३० वर्ष  दरम्यान असावे. तसेच सहाय्यक लेखा परिक्षण अधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी, सहाय्यक विभाग अधिकारी, सहाय्यक विभाग अधिकारी, प्राप्तिकर निरीक्षक, निरीक्षक (उत्पादन शुल्क), सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, निरीक्षक, सहाय्यक/ अधीक्षक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, सांख्यिकीय अन्वेषक (श्रेणी-२) पदांकरिता कमाल वय ३० वर्ष आणि कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी पदांकरिता ३२ वर्षांपेक्षा जास्त नसावे, तर लेखापरीक्षक पदाकरिता १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे.

परीक्षा फीस – सर्वच प्रवर्गातील उमेदवारांकरिता परीक्षा फीस १००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ माजी सैनिक/ महिला प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ८ आक्टोबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

जाहिरात पाहा

टेलीग्राम जॉईन करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.