राजस्थान उच्च न्यायालयाच्या आस्थापनेवर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या ३६७८ जागा
उच्च न्यायालय राजस्थान, जोधपुर यांच्या आस्थापनेवरील चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदांच्या एकूण ३६७८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०१९ आहे.
चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदांच्या ३६७८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार राजस्थान सरकारच्या मान्यताप्राप्त बोर्डातून किमान इय्यता दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी १५०/- रुपये आहे तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी १००/- रुपये आहे.
वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह १२,४००/- रुपये मानधन मिळेल.
वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील पुरुष उमेदवाराचे वय १८ ते ४० दरम्यान असावे तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक १8 नोव्हेंबर २०१९ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.