जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३५७० जागा

राज्यातील विविध जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून २६ मार्च २०१९ पासून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जिल्हा परिषदांतील विविध पदांच्या १३५७० जागा
अहमदनगर ७२९ जागा, अकोला २४२ जागा, अमरावती ४६३ जागा, औरंगाबाद ३६२ जागा, बीड ४५६ जागा, भंडारा १४३ जागा, बुलढाणा ३३२ जागा, चंद्रपूर ३२३ जागा, धुळे २१९ जागा, गडचिरोली ३३५ जागा, गोंदिया २५७ जागा, हिंगोली १५० जागा, जालना ३२८ जागा, जळगाव ६०७ जागा, कोल्हापूर ५५२ जागा, लातूर २८६ जागा, उस्मानाबाद ३२० जागा, मुंबई (उपनगर) ३५ जागा, नागपूर ४०५ जागा, नांदेड ५५७ जागा, नंदुरबार ३३२ जागा, नाशिक ६८७ जागा, पालघर ७०८ जागा, परभणी २५९ जागा, पुणे ५९५ जागा, रायगड ५१० जागा, रत्नागिरी ४६६ जागा, सातारा ७०८ जागा, सांगली ४७१ जागा, सिंधुदुर्ग १७१ जागा, सोलापूर ४१५ जागा, ठाणे १९६ जागा, वर्धा २६४ जागा, वाशिम १८२ जागा आणि यवतमाळ ५०५ जागा

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार स्थापत्य अभियांत्रिकी पदवी/ पदविका आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी/ पदविका आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

कंत्राटी ग्रामसेवक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६०% गुणांसह बारावी उत्तीर्ण किंवा अभियांत्रिकी पदविका किंवा बीएसडब्ल्यू किंवा कृषी पदविका आणि आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.
औषध निर्माता पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.फार्मसी किंवा डी.फार्मसीआणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान शाखेतून (बी.एस्सी.) आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता व धारक असावा.

आरोग्य सेवक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान विषय घेऊन दहावी उत्तीर्ण झालेला असावा. (आरक्षित जागांच्या भरतीसाठी राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोध कार्यक्रमांतर्गत हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून ९० दिवसाचा फवारणी कामाचा अनुभव असावा.)

आरोग्य सेविका पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद किंवा नोंदणीसाठी पात्रताधारक असावी.

विस्तार अधिकारी (कृषी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कृषी पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

विस्तार अधिकारी (सांख्यिकी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार विज्ञान, कृषी, वाणिज्य, किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/ सांख्यिकी विषयासह पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्णसह स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य कोर्स आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

पशुधन पर्यवेक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य पदवी आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

आरोग्य पर्यवेक्षक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी.एस्सी. पदवी किंवा आरोग्य कर्मचारी कोर्स आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

वरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार लेखाशास्त्र व लेखा परीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्णसह ३ वर्ष अनुभव आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून
पदवीसह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक ३ वर्ष अनुभव धारक असावा.

पर्यवेक्षिका (अंगणवाडी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार समाजशास्त्र/ गृहविज्ञान/ शिक्षण/ बालविकास/ पोषण विषय घेऊन पदवी उत्तीर्ण आणि शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

कनिष्ठ लेखाधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून
पदवीसह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक असावा.

कनिष्ठ यांत्रिकी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार तांत्रिक शिक्षण विभागाच्या यांत्रिकी विषयातील कोर्ससह शासकीय नियमाप्रमाणे संगणक अर्हता धारक आणि ५ वर्ष अनुभव धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १६ एप्रिल २०१९ रोजी १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी २५०/- रुपये आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – २६ मार्च २०१९ (रात्री १० वाजेपासून) आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ एप्रिल २०१९ आहे.

अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवशयक आहे.

 

ऑनलाईन अर्ज करा

जाहिरात डाऊनलोड करा

| अहमदनगरअकोलाअमरावतीऔरंगाबादबीडभंडाराबुलढाणा  | चंद्रपूर | धुळे | गडचिरोलीगोंदियाहिंगोली | जालना | जळगाव | कोल्हापूरलातूर | उस्मानाबाद | नागपूर  |  नांदेड | नंदुरबार  |  नाशिक  |  पालघरपरभणी | पुणेरायगड | रत्नागिरी | सातारा | सांगली | सिंधुदुर्गसोलापूरठाणे | वर्धावाशिमयवतमाळ

 

 

Visit us www.nmk.co.in 

 

 

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});