वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये खाण कामगार पदाच्या एकूण ३३३ जागा

भारत सरकारच्या अधिपत्याखालील वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील खाण कामगार/ शॉट फायरर पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.

खाण कामगार/ शॉट फायरर पदाच्या ३३३ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार खाण कामगार व्यवसाय प्रमाणपत्र धारक किंवा खाण सर्वेक्षण डिप्लोमा व ओवरमन प्रमाणपत्र किंवा गॅस परिक्षण प्रमाणपत्र किंवा प्रथमोपचार प्रमाणपत्र किंवा तत्सम पात्रता धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३१ ऑगस्ट २०१८ रोजी १८ ते ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती- जमातीच्या उमेदवारांना ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – नागपूर

फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना १००/- रुपये तर अनुसूचित जाती- जमातीच्या उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – General Manager(P/IR), Western Coalfields Limited, Coal Estate, Civil Lines, Nagpur-440001

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – २७ सप्टेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

संबंधित संकेतस्थळ

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});