केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त विविध तांत्रिक पदाच्या एकूण ८१ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फ़त विविध तांत्रिक पदाच्या ८१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख १ नोव्हेंबर २०१८ आहे.

विविध तांत्रिक पदाच्या एकूण ८१ जागा
पदे – असिस्टंट इंजिनिअर पदाच्या २ जागा, असिस्टंट इंजिनिअर (मेकॅनिकल) पदाची १ जागा, डेप्युटी आर्किटेक्ट पदाच्या ७ जागा,
प्रिंसिपल डिझाइन ऑफिसर पदाची १ जागा, रेफ्रिजरेशन इंजिनिअर पदाची १ जागा, डेप्युटी डायरेक्टर (सेफ्टी) (सिव्हिल) पदाची १ जागा, ॲडिशनल असिस्टंट डायरेक्टर (सेफ्टी) (मेकॅनिकल) पदाची १ जागा, डेप्युटी डायरेक्टर, माईन सेफ्टी (इलेक्ट्रिकल) पदाच्या २३ जागा आणि डेप्युटी डायरेक्टर, माईन सेफ्टी (मायनिंग) पदाच्या ४४ जागा

शैक्षणिक पात्रता – इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी  आणि २ वर्षे अनुभव, मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी आणि २ वर्षे अनुभव, आर्किटेक्चर पदवी आणि २ वर्षे अनुभव, इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ टेलीकम्युनिकेशन  इंजिनिअरिंग पदवी आणि १० वर्षे अनुभव, इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी  आणि १ वर्ष अनुभव, सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  आणि ५ वर्षे अनुभव, मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी आणि २ वर्षे अनुभव, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी  आणि १० वर्षे अनुभव, मायनिंग इंजिनिअरिंग पदवी आणि १० वर्षे अनुभव आवश्यक आहे.

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय १ नोव्हेंबर २०१८ रोजी ३५, ४० आणि ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्ष सवलत.)

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

परीक्षा फीस – सर्वसाधारण/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी २५/- रुपये आणि अनुसूचित जाती- जमाती/ महिला/ अपंग उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ नोव्हेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

Comments are closed.