केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या ८८६ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ८८६ जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या भारतीय वनसेवा परीक्षा-२०२० आणि नागरी सेवा पूर्व परीक्षा-२०२० परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८८६ जागा
भारतीय वन सेवा परीक्षा आणि नागरी सेवा पूर्व परीक्षा आयोजित करण्यात येत आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२० रोजी किमान २१  वर्ष ते  कमाल ३२ वर्ष दरम्यान असावे.

फीस – परीक्षा शुल्क १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ मार्च २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});