तारापूर येथील भाभा अणु संशोधन केंद्राच्या आस्थापनेवर एकूण ३४ जागा
भारत सरकारच्या मुंबई (तारापूर) येथील भाभा अणु संशोधन केंद्र यांच्या खरेदी आणि स्टोअर्स संचालनालयाच्या आस्थापनेवर वरिष्ठ लिपिक/ कनिष्ठ खरेदी सहाय्यक/ कनिष्ठ भांडारपाल पदाच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
वरिष्ठ लिपिक/ कनिष्ठ खरेदी सहाय्यक/ भांडारपाल पदाच्या ३४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आणि इंग्रजी टंकलेखन ३० श.प्र.मि. व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०१८ रोजी १८ ते २७ वर्षे दरम्यान असावे. (अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष तर इतर मागासवर्गीय उमेदवरांना ३ वर्ष सवलत.)
परीक्षा फीस – नाही
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० सप्टेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.