बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५९ जागा
बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
किंमत आणि व्यवस्थापन लेखनिक पदाच्या ५० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर आणि सीए/ आयसीडब्ल्यूए उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० ते ३० वर्षे दरम्यान असावे.
ट्रेझरी डीलर पदाच्या एकूण ६ जागा
शैक्षणिक पात्रता – एमबीए/ सीए/ सीएफए/ आयसीडब्यूए आणि ३ किंवा ४ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २३ ते ४० वर्षे दरम्यान असावे.
अर्थशास्त्री पदाच्या एकूण २ जागा
शैक्षणिक पात्रता – पीएचडी (अर्थशास्त्र) आणि ६ वर्षे अनुभव आवश्यक किंवा अर्थशाश्त्राची पदव्युत्तर पदवी आणि २ वर्षे अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २८ ते ३० वर्षे आणि २३ ते ३३ वर्षे दरम्यान असावे.
व्यवस्थापक (खर्च) पदाची १ जागा
शैक्षणिक पात्रता – आयसीडब्यूए/ एमए (अर्थशाश्त्र) आणि 2 वर्षे अनुभव आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २३ ते ३३ वर्षे दरम्यान असावे.
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ६००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ जमातीच्या उमेदवारांना १००/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ सप्टेंबर २०१८ असून अर्ज भरल्यानंतर अर्ज प्रत ३ आक्टोबर २०१८ पूर्वी संबंधित पत्त्यावर मिळेल अशा पद्धतीने पोस्टाने पाठविणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.