राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स मध्ये विविध पदाच्या ८३ जागा

राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदाच्या एकूण ८३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

अधिकारी (मार्केटिंग) पदाच्या १५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान ६०% गुणांसह बी.एस्सी./ अभियांत्रिकी/ कृषी पदवीधारक (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदारांना किमान ५५% गुण असावेत) किंवा एमबीएस/ एमएमएस अर्हता आणि २ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते २८ दरम्यान असावे.

अधिकारी (अग्निशमन) पदाच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान ५५% गुणांसह बी.ई./ बी.टेक.(अग्निशमन) अर्हता आणि किमान २ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३० दरम्यान असावे.

अभियंता (इलेक्ट्रिकल) पदाच्या २० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान ५५% गुणांसह बी.ई./ बी.टेक./ बी.एस्सी.अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल) अर्हता धारक (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदारांना किमान ५०% गुण असावेत) आणि किमान २ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३० दरम्यान असावे.

अभियंता (केमिकल) पदाच्या ४१ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान ५५% गुणांसह बी.ई./ बी.टेक/ बी.एस्सी.अभियांत्रिकी (केमिकल) अर्हता धारक (अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गातील उमेदारांना किमान ५०% गुण असावेत) आणि किमान २ वर्ष अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३० दरम्यान असावे.

अभियंता (पर्यावरण) पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान ५५% गुणांसह बी.ई./ बी.टेक/ बी.एस्सी.अभियांत्रिकी (पर्यावरण) किंवा समतुल्य अर्हता आणि २ वर्षे अनुभव धारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३२ दरम्यान असावे.

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्रात कुठेही

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास/ अर्थीक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ७००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ८ एप्रिल २०१९ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Comments are closed.

Visitor Hit Counter