महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वन सेवा मुख्य परीक्षा-२०१८ जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वनरक्षक आणि वनक्षेत्रपाल पदाच्या ६९ जागा भरण्यासाठी रविवार दिनांक २८ आक्टोबर २०१८ रोजी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-२०१८ मध्ये सहभागी होण्यासाठी केवळ पूर्व परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा- २०१८
सहाय्यक वनरक्षक- १६ आणि वनक्षेत्रपाल- ५३ जागा

शैक्षणिक पात्रता – वनक्षेत्रपाल पदांसाठी उमेदवाराने वनस्पतीशास्त्र/ रसायनशास्त्र/ वनशास्त्र/ भूशास्त्र/ गणित/ भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ प्राणीशास्त्र/ उद्यानविद्या/ पशु संवर्धन किंवा पशुवैद्यकशास्त्र किंवा कृषि, इंजिनिअरिंग पदवी किंवा समकक्ष अर्हता धारण केलेली असणे आवश्यक असून वन सेवा पूर्व परीक्षेत पात्र ठरलेला असावा. तसेच सहाय्यक वनसंरक्षक पदांसाठी वनस्पतीशास्त्र/ रसायनशास्त्र/ वनशास्त्र/ भूशास्त्र/ गणित/ भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ प्राणीशास्त्र/ उद्यानविद्या/ पशुवैद्यकशास्त्र किंवा कृषि/ इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य आणि महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षेत पात्र ठरलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवारांचे वय १ जुलै २०१८ रोजी सहाय्यक वनसंरक्षक पदांसाठी १८ ते ३८ वर्ष आणि वनक्षेत्रपाल पदांसाठी २१ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षे सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवरांना ५२४/- रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना ३२४/- रुपये राहील.)

परीक्षा – २८ ऑक्टोबर २०१८ रोजी घेण्यात येईल.

परीक्षा केंद्र – मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २६ सप्टेंबर २०१८ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});