लोकसेवा आयोगामार्फत शिक्षण/ क्रीडा विभागात एकूण ३६ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट-ब [प्रशासन शाखा] संवर्गातील पदांच्या एकूण ३६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३६ जागा
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून अधीक्षक व तत्सम पदे, सामान्य राज्य सेवा, गट-ब [प्रशासन शाखा] संवर्गातील पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने किमान द्वितीय श्रेणी मधून पदव्युत्तर पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून उत्तीर्ण आणि किमान ३ वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा– उमेदवारांचे वय दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी २५ ते ३८ वर्ष दरम्यान असावे, तसेच मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ प्रवर्गातील उमेद्वारांसाठी ५ वर्ष सवलत राहील.
परीक्षा शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवरांसाठी ७१९/- रुपये आणि मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग प्रवर्गातील उमेद्वारांसाठी ४४९/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!