महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अभियांत्रिकी पदाच्या ११६१ जागा

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत अभियांत्रिकी संवर्गातील विविध पदाच्या ११६१ जागा भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फ़त महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०१९ परीक्षा रविवार, दिनांक २३ जून २०१९ रोजी मुंबई, औरंगाबाद, नागपूर आणि पुणे या केंद्रांवर आयोजित करण्यात येत असून सदरील परीक्षेत सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

जलसंपदा विभागात पदाच्या ५८१ जागा
सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) पदाच्या ७ जागा, सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदाच्या २१ जागा आणि सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदाच्या ५५३ जागा

सार्वजनिक बांधकाम विभागात ३०२ जागा
सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) पदाच्या ६ जागा, सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदाच्या १६ जागा, सहाय्यक अभियंता (स्थापत्य) पदाच्या २६४ जागा आणि सहाय्यक अभियंता (विद्युत) पदाच्या १६ जागा

मृद व जलसंधारण विभागात २७८ जागा
उपविभागीय जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) पदाच्या ८४ जागा आणि जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) पदाच्या १९४ जागा

शैक्षणिक पात्रता – स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील पदांकरिता उमेदवाराने अभियांत्रिकी पदवी किंवा बी.ई.(Civil and Water Management/ Civil and Environmental/ Structural/ Construction Engineering/ Technology) तसेच स्थापत्य अभियांत्रिकी संवर्गातील पदांकरिता उमेदवाराने विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा बी.ई. (Electrical and Power Engineering/ Electronics and Power Engineering/ Power System Engineering/ Electrical and Electronics Engineering) इत्यादी समतुल्य अर्हता धारण केलेली असावी

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०१९ रोजी १९ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ३७४/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांना २७४/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ एप्रिल २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

Visit us www.nmk.co.in 

 

 

 

Comments are closed.