जालना जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी पदाच्या एकूण २८ जागा
जिल्हाधिकारी कार्यालय (महसूल व वनविभाग, जालना यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील तलाठी पदाच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
तलाठी (गट-क) पदाच्या एकूण २८ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधारक किंवा तत्सम अर्हता धारण केलेला असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत असून आरक्षण प्राप्त उमेदवारांना सरकारी नियमाप्रमाणे सवलत देय राहील.)
परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटकांसाठी ३५०/- रुपये आहे.
अर्ज सुरु होण्याची तारीख – १ मार्च २०१९ (रात्री १० वाजेपासून) सुरु होतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ मार्च २०१९ (रात्री ११:५९ वाजेपर्यंत) आहे.
माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात नंतर डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.