जळगाव येथे नोव्हेंबर मध्ये खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन
भारतीय संरक्षण दलाच्या औरंगाबाद विभागीय कार्यालयामार्फत सैन्य दलातील विविध पदांच्या थेट भरतीसाठी दिनांक २० नोव्हेंबर २०१८ ते ३० नोव्हेंबर २०१८ दरम्यान जळगाव येथे सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सदरील मेळाव्यात सहभागी होण्यासाठी औरंगाबाद, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, जालना, हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्हयातील उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
सोल्जर जनरल ड्यूटी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ४५% गुणांसह १० वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ वर्ष ६ महिने ते २१ वर्षे दरम्यान असावे.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६८ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.
सोल्जर टेक्निकल पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ वर्ष ६ महिने ते २३ वर्षे दरम्यान असावे.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६७ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.
सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन/ दारुगोळा निरीक्षक) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाईल/ संगणक ज्ञान/ इलेक्ट्रॉनिक & इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा/ उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ वर्ष ६ महिने ते २३ वर्षे दरम्यान असावे.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६७ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.
सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा बी.एस्सी. उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ वर्ष ६ महिने ते २३ वर्षे दरम्यान असावे.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६७ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.
सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण (PCM) किंवा बी.एस्सी. उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ वर्ष ६ महिने ते २३ वर्षे दरम्यान असावे.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६७ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.
सोल्जर क्लर्क /स्टोअर कीपर टेक्निकल (SKT) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ वर्ष ६ महिने ते २३ वर्षे दरम्यान असावे.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६२ सेंमी, वजन ५० किलोग्रॅम आणि छाती ७७/८२ सेंमी असावी.
सोल्जर (ट्रेड्समन) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार आठवी/ दहावी उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १७ वर्ष ६ महिने ते २३ वर्षे दरम्यान असावे.
शारीरिक पात्रता – उमेदवारांची उंची: १६८ सेंमी, वजन ४८ किलोग्रॅम आणि छाती ७६/८१ सेंमी असावी.
मेळाव्याचे ठिकाण – छत्रपति शिवाजी महाराज स्टेडियम, जळगाव.
कालावधी – २० नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०१८ दरम्यान आहे.
प्रवेशपत्र – ५ ते ९ नोव्हेंबर २०१८ दरम्यान उपलब्ध होतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ नोव्हेंबर २०१८ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.