गेल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १७६ जागा

गेल इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील वरिष्ठ अभियांत्रिकी आणि अधिकारी पदाच्या एकूण १७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

वरिष्ठ अभियांत्रिकी पदाच्या ९४ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार ६५% गुणांसह केमिकल/ पेट्रोकेमिकल/ केमिकल टेक्नोलॉजी/ पेट्रोकेमिकल टेक्नोलॉजी/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मॅकेनिकल/ प्रोडक्शन/ प्रोडक्शन & इंडस्ट्रियल/ मॅन्युफॅक्चरिंग/ सिव्हिल/ इंस्ट्रुमेंटेशन/ पर्यावरणीय/ ऑटोमोबाईल/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवीधारक आणि किमान १ वर्ष अनुभव असावा.

विविध अधिकारी पदाच्या ८२ जागा
शैक्षणिक पात्रता – (a) उमेदवार ६५% गुणांसह अग्निशामक इंजिनिअरिंग पदवीधारक आणि १ वर्ष अनुभव असावा. (b) उमेदवार ६५% गुणांसह केमिकल/ मॅकेनिकल/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल/ सिव्हिल/ आयटी/ मेटलर्जी/ टेलीकम्युनिकेशन/ कॉम्पुटर सायन्स इंजिनिअरिंग पदवीधारक आणि १ वर्ष अनुभव धारक असावा. (c) उमेदवार ६५% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी किंवा एमबीए आणि १ वर्ष अनुभव धारक असावा. (d) उमेदवार ६०% गुणांसह सीए/ आयसीडब्ल्यूए किंवा बी.कॉम. किंवा एमबीए आणि १ वर्ष अनुभव धारक असावा. (e) उमेदवार ६०% गुणांसह पदवीधरसह एमबीए/ एमएसडब्ल्यू आणि १ वर्ष अनुभव धारक असावा. (f) उमेदवार ६०% गुणांसह एलएलबी आणि १ वर्ष अनुभव धारक असावा. (g) उमेदवार ६०% गुणांसह पदवीधर/ पदव्युत्तर पदवी (Communication / Advertising and Communication Management/ Public Relations/ Mass Communication/ Journalism) आणि १ वर्ष अनुभव धारक असावा. (h) उमेदवार एमबीबीएस, डीजीओ, डीसीएच डिप्लोमा आणि १ वर्ष अनुभव धारक असावा. (i) उमेदवार ६०% गुणांसह एम.सी.(रसायनशास्त्र) आणि ३ वर्षे अनुभव धारक असावा. (j) उमेदवार ६०% गुणांसह हिंदी साहित्य इंग्रजी
विषयासह पदवीधर असणे आवश्यक आहे आणि २ वर्षे अनुभव धारक असावा.

वयोमर्यादा – ३१ डिसेंबर २०१८ रोजी उमेदवाराचे वय २८ किंवा ३५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष इतर मागासवर्गणीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवरांसाठी २००/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – १५ जानेवारी २०१८ (सायंकाळी ६ वाजेपर्यंत)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

 

 

Comments are closed.