भारतीय सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदाच्या एकूण १०७२ जागा
भारत सरकारच्या ग्रह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सीमा सुरक्षा दल (बी.एस.एफ.) मध्ये कॉन्स्टेबल पदाच्या एकूण १०७२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ ऑपरेटर) पदाच्या ३०० जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण व आयटीआय (रेडिओ आणि टीव्ही/इलेक्ट्रॉनिक्स/ COPA/ डाटा प्रिपरेशन & कॉम्पुटर सॉफ्टवेअर जनरल इलेक्ट्रॉनिक्स/ डाटा एंट्री ऑपरेटर किंवा ६०% गुणांसह बारावी (भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ गणित विषयांसह) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
हेड कॉन्स्टेबल (रेडिओ मेकॅनिक) पदाच्या ७७२ जागा
शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण व आयटीआय (रेडिओ आणि टीव्ही/ जनरल इलेक्ट्रॉनिक्स/ COPA/ डाटा प्रिपरेशन आणि कॉम्पुटर सॉफ्टवेअर जनरल इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिशिअन/ फिटर/ आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम मेंटेनेंस/ कॉम्पुटर मेंटेनेंस/ कॉम्पुटर हार्डवेअर/ नेटवर्क मेकॅनिक/ मेक्ट्रोनिक्स/ डाटा एंट्री ऑपरेटर किंवा ६०% गुणांसह बारावी (भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ गणित विषयांसह) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
शाररिक पात्रता – पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची १६८ सेंमी तर छाती ८०-८५ सेंमी असावी तर महिला उमेदवारांसाठी किमान उंची १५७ सेंमी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १२ जून २०१९ रोजी १८ ते २५ वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही
परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागासवर्गीय उमेदवारांना १००/- रुपये आहे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत.)
परीक्षा – चाळणी परीक्षा (OMR) पद्धतीने २८ जुलै २०१९ रोजी तर लेखी परीक्षा २४ नोव्हेंबर २०१९ रोजी घेण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १२ जून २०१९ (रात्री ११:५९ पर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.