सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या ८६ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती दिनांक ३ व ५ नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८६ जागा
नेफरोलॉजिस्ट, कार्डियोलॉजिस्ट, अनेस्थेटिस्ट, अँड सर्जन, ओबीजीवायएन स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, फिजिशियन, सर्जन, पॅथॉलॉजिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात पाहावी.
वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्ष तसेच राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी ४३ वर्ष आणि निवृत्त शासकीय अधिकारी असलेल्या उमेदवारांसाठी ७० वर्ष आहे. (एन.एच.एम कर्मचारीकरिता कमाल वयोमर्यादा ५ वर्ष शिथिल असेल.)
मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद सातारा.
मुलाखतीची तारीख – दिनांक ३ व ५ डिसेंबर २०१९ रोजी उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.