लातूर जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ७६ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७६ जागा
कोल्ड चेन टेक्निशियन, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, काउन्सिलर, वैद्यकीय अधिकारी (RBSK), वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), बालरोगतज्ञ, OBGY/ स्त्री रोग विशेषज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, फिजिशियन/ सल्लागार औषध, मानसोपचारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट आणि सायकोलॉजिस्ट पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ जुलै २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
-
- कोल्ड चेन टेक्निशियन, स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन पदांकरिता ‘राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर’ येथे अर्ज पाठवावेत.
- इतर पदांकरिता ‘जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, बार्शी रोड, ग्रॅड हाटेलच्या समोर, लातूर’ येथे अर्ज पाठवावेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.