लातूर जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण २४ जागा 

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, लातूर यांच्या आस्थापनेवरील पदांच्या एकूण २४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून वैद्यकीय अधिकारी, डायलेसिस टेक्नीशियन, टीबीएचव्ही पदांकरिता विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत तर इतर पदांकरिता थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४ जागा 
वैद्यकीय अधिकारी, डायलेसिस टेक्नीशियन, टीबीएचव्ही, हृदयरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, मनोविकारतज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी आणि अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी १००/- रुपये आहे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – जिल्हा आरोग्य अधिकारी, एनएचएम सेल, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, लातूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – वैद्यकीय अधिकारी, डायलेसिस टेक्नीशियन, टीबीएचव्ही पदांकरिता दिनांक १३ मार्च २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, लातूर.

मुलाखतीची तारीख – इतर पदांकरिता दिनांक ६ मार्च २०२०  रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});