धुळे महानगरपालिकेत लिपिक टंकलेखक/ कॉम्प्युटर ऑपरेटर पदांच्या २३ जागा

धुळे महानगरपालिका, धुळे यांच्या आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक (कॉम्प्युटर ऑपरेटर) पदांच्या एकूण 23 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

लिपिक टंकलेखक (कॉम्प्युटर ऑपरेटर) पदांच्या 23 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे तसेच मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवाराचे कमाल वय ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.

मुलाखतीची तारीख – उमेदवारांनी दिनांक ४ मार्च २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – मनपा नवीन प्रशासकीय इमारत, अटलबिहारी वाजपेयी मुख्य सभागृह, महानगरपालिका, धुळे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.