बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ७ जागा
जिल्हा आरोग्य विभाग, बुलढाणा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७ जागा
डॉक्टर (वैद्यक), प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ आणि ईएनटी तज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ एप्रिल २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – तालुका आरोग्य अधिकारी, तालुका कार्यालय, शेगाव रोड, सामान्य रूग्णालय परिसर, खामगाव, जि. बुलढाणा.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.