अकोला राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ४८ जागा
राष्ट्रीय आरोग्य अभियान, अकोला अंतर्गत आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४८ जागा
हृदयरोगतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, OBGY, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन/ सल्लागार औषध, मानसोपचारतज्ज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आयुष, ऑप्टोमेट्रीस्ट, विशेष शिक्षक, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, प्रशिक्षक, पॅरामेडिकल वर्कर, जिल्हा कार्यप्रणाली व्यवस्थापक, डाटा एंट्री ऑपरेटर, सुविधा व्यवस्थापक आणि स्टाफ नर्स पदांच्या जागा
वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्ष तर राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्ष एवढी आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान, कार्यालय, जिल्हा परिषद कर्मचारी भवन, आकाशवाणी समोर, अकोला.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.