महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नागरीसेवा पदांच्या एकूण ४७७ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या विविध आस्थापनेवरील विविध राजपत्रित अधिकारी पदांच्या एकूण ४७७ जागा भरण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राज्यसेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२४ मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४७७ जागा
उप जिल्हाधिकारी (गट-अ) पदांच्या जागा, पोलीस उपाधीक्षक/ सहाय्यक पोलीस आयुक्त (निशस्त्र) पदांच्या २० जागा, सहाय्यक राज्य कर आयुक्त (गट-अ) पदांच्या ११६ जागा, गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी) पदांच्या ५२ जागा, सहाय्यक संचालक (वित्त व लेखा सेवा) पदांच्या ४३  जागा, सहाय्यक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प) पदांच्या जागा, उद्योग उप संचालक (तांत्रिक) पदांच्या  जागा, सहाय्यक कामगार आयुक्त पदांच्या जागा, सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता) पदाची जागा, मुख्याधिकारी/ सहाय्यक आयुक्त पदांच्या २६ जागा, मंत्रालयीन कक्ष अधिकारी पदांच्या १९ जागा, सहाय्यक गट विकास अधिकारी २५ जागा, सहाय्यक आयुक्त (राज्य उत्पादन शुल्क) पदांची जागा, उपाधीक्षक (राज्य उत्पादन शुल्क) पदांच्या जागा, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता- मार्गदर्शन अधिकारी पदांच्या जागा, सरकारी कामगार अधिकारी पदांच्या जागा, सहाय्यक प्रकल्प/ सांख्यिकी/ प्रशासकीय/ संशोधन अधिकारी/ गृहप्रमुख/ प्रबंधक पदांच्या जागा, उद्योग अधिकारी (तांत्रिक) पदांच्या  जागा, सहाय्यक प्रकल्प अधिकारी (शिक्षण- आदिवासी विकास आयुक्तालय) पदांच्या ५२ जागा आणि निरीक्षण अधिकारी (पुरवठा) पदांच्या ७६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३ एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});