राज्यात लिपिक (गट-क) पदांच्या जागा लोकसेवा आयोगामार्फत भरणार

राज्य सरकारच्या अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय कार्यालयातील व भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क व गट-ड मधील पदांची भरती सरळसेवा पदभरती जिल्हा/ प्रादेशिक/ जिल्हास्तरीय निवडसमित्यांमार्फत करण्यात येत होती. तथापि त्यापैकी गट-क मधील लिपिक-टंकलेखक संवर्गातील पदांच्या सर्व जागा यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सरळसेवेने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी विचारविनिमय करून बृहन्मुंबई व राज्यातील विविध शासकीय कार्यालयातील लिपिक-टंकलेखक पदांच्या भरतीसाठी कार्यपद्धती जाहीर केली असून यामध्ये विधान मंडळ सचिवालय, राज्य निवडणूक अयोग, महालेखापाल, माहिती व जनसंपर्क संचालयानालय, मुख्य लेखापरीक्षक, राज्यातील जिल्ह्याधिकारी/ जिल्हा परिषद, राज्य सरकारच्या अख्त्यारीत येणारे सर्व कार्यालय व सर्व मंत्रालयीन विभागातील जागांचा समावेश आहे.

शासन निर्णय पाहा

टेलिग्राम जॉईन करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});