लोकसेवा आयोग यांच्यामार्फत औषध निरीक्षक पदांच्या १०९ जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्या अधिपत्याखालील आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयातील आस्थापनेवरील औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन संवर्गातील पदांच्या एकूण १०९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
औषध निरीक्षक पदांच्या १०९ जागा
औषध निरीक्षक, गट-ब, अन्न व औषध प्रशासन संवर्गातील पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा क्लिनिकल फार्माकोलॉजी किंवा मायक्रोबायोलॉजी विषयातून फार्मसी किंवा फार्मास्युटिकल सायन्स किंवा मेडिसिन मध्ये पदवीधारक असणे आवश्यक आहे. (Possess a degree in pharmacy or pharmaceutical science or medicine with specialization in clinical pharmacology or microbiology.)
वयोमर्यादा– उमेदवारांचे वय दिनांक १ नोव्हेंबर २०२५ रोजी १८ ते ३८ वर्ष असावे तसेच मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग प्रवर्गातील उमेद्वारांसाठी ५ वर्ष सवलत राहील.
परीक्षा शुल्क – खुल्या प्रवर्गातील उमेदवरांसाठी ३९४/- रुपये आणि मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग प्रवर्गातील उमेद्वारांसाठी २९४/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!