अमरावती महानगरपालिकेच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४ जागा

एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी महानगरपालिका, अमरावती अंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभाग, अमरावती यांच्या आस्थापनेवरील अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या ४ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने एमबीबीएस अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ७० वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ एप्रिल २०२१ रोजी ४ वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान कार्यालय, सार्वजनिक आरोग्य विभाग अमरावती महानगरपलिका, राजकमल चौक, अमरावती.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.