राज्यात विविध विभागातील ७० हजार पदांसाठी लवकरच भरती प्रक्रिया

राज्यात लवकरच जवळपास ७० हजार पदांसाठी टप्प्याटप्प्याने भरती केली जाणार असून सुरुवातीला पोलिस दलातील ७१११ पदे प्राधान्याने भरणार आहेत. राज्यात सध्या ग्रामविकास विभागात ११००० जागा, आरोग्य विभागात १०५६० जागा, सार्वजनिक बांधकाम विभागात ८३३० जागा, जलसंपदा विभागात ८२२० जागा, जलसंधारण विभागात २४३३ जागा, नगरविकास विभागात १५०० जागा, कृषी विभागात २५०० जागा, पशु व संवर्धन विभागात १०४७ जागा असे विविध विभागातील सुमारे ६० ते ७० हजार रिक्त पदे भरण्यासाठी महाभरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सध्या रिक्त असलेल्या जागांचा विभागनिहाय आढावा नुकताच मुख्यमंत्र्यांनी घेतला असून भरती लवकर सुरु व्हावी यावर सर्वच मंत्र्यांचे एकमत झाल्याचे समजते.

अधिक बातम्या वाचा


Comments are closed.