तुमच्या भावाच्या पंखांना बळ द्या !! प्रा.सचिन ढवळे सरांचे भावनिक आवाहन

सर्वांना नमस्कार

आपण जाणताच की तुमच्या सगळ्यांच्या पाठबळावर मी मराठवाडा पदवीधरसाठी उभा आहे. मित्रांनो ही लढाई प्रचंड धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. तुमच्या माझ्यासारखी सर्वसामान्य माणसं निवडणुकीला उभा राहिलीच नाही पाहिजेत अशी व्यवस्थाच या देशात निर्माण केली जातेय. सत्तेच्या जोरावर पैसा अन पैशाच्या जोरावर पुन्हा सत्ता हे काही लोकांचं धोरण बनलं आहे. मित्रांनो मी फार संघर्षातून उभा राहिलेला सामान्य कार्यकर्ता आहे. संघर्ष माझ्या रक्तात आहे. खरं तर माझं आयुष्य हे सुखासीन चालू असताना ही जोखीम पत्कारली नसती तरी चालत होतं पण ही ‘लोकशाही केवळ शाही लोकांची होता कामा नये’ यासाठी मी या मैदानात उतरलोय. आपल्या लोकांसाठी काहीतरी भव्य करायचंय ही प्रामाणिक तळमळ माझ्या मनात आहे, आणि ही लढाई आपल्या सर्वांची आहे.

मी अनेक दबावांना, दहशतीला फाट्यावर मारून ऊरलोय. तुमच्या पाठिंब्यावर मी विनाशक शक्तीला पुरून उरेल.
इतकंच नाही तर कोटींच्या आमिशाला लाथ मारली आहे. त्याला बळी पडण्याचा विषयच येणार नाही कारण मी ही गटारगंगा साफ करायला आलोय, अजून घाण करायला नाही. गेल्या ४ वर्षांपासून आपली टीम झपाटल्या सारखी काम करतेय.

खरं तर मला नकारात्मक प्रचार करायचा नाही पण विद्यमान आमदारांनी गेल्या १२ वर्षात पदवीधरचा ‘प’ देखील उच्चारला नसल्याने मतदारात त्यांच्या विषयी असलेली प्रचंड नाराजी, १२ वर्षे सत्तेत राहिल्याने तयार झालेली अँटी इन्कमबन्सी, दुसऱ्या एका पक्षात झालेली बंडाळी, चाललेला सावळा गोंधळ यामुळे आपला विजय निश्चित आहे.

वारं फिरलंय… इतकंच नाही तर विरोधी पक्षातले देखील अनेक लोकं आपल्याला सर्वोत्तपरी सहकार्य करायच्या तयारीत आहेत. तुम्ही सर्वांनी आतापर्यंत जे प्रेम दिलंय, जो अभूतपूर्व प्रतिसाद दिलाय त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत अशीच साथ द्या. मी आयुष्याचा शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्यासाठी संघर्ष करणार आहे.

जे मतदार आहेत त्यांनी पहिल्या पसंतीचं मतदान द्यावं, ज्यांना वेळ देता येईल त्यांनी वेळ द्यावा आणि ज्यांना पाठबळ देता येईल त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष द्यावं हीच अपेक्षा !!

आपलाच

प्रा. सचिन राजाराम ढवळे उर्फ मास्तर

 

7 Comments
  1. Satish says

    Nice

  2. Vikas pathare says

    Sir you are definitely win

  3. Shivaji Namdeo kadam says

    Sir tumchysobat

  4. Indrajeet Jadhav says

    ???

  5. Yogesh patil says

    ✌️✌️

  6. SACHIN KOTWAL says

    Good luck

  7. Mohan Pokale says

    Sir, tum aage badho, hum aapke sath hai

Comments are closed.