नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या १२ जागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक (GMC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्याकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १२ जागा
सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी आणि शिक्षक/ प्रात्यक्षिक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – हिंदु हदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, बिटको रुग्णालय, पहिला मजला मुक्तीधाम जवळ, राजवाडा नगर, देवळाली, ता. जि. नाशिक, पिनकोड- ४२२ २१४
मुलाखतीची तारीख – दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता यांचे कार्यालय, हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालय, पहिला मजला, राजवाडा नगर, देवळाली, ता. जि. नाशिक, पिनकोड- ४२२ २१४
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!