वर्धा माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना विविध पदांच्या १३ जागा
माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना, वर्धा (ECHS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्याकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १३ जागा
प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, दंत A/ T/ H, फार्मासिस्ट, नर्सिंग सहाय्यक, महिला परिचर आणि सफाईवाला पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – OIC, Stn HQ (ईसीएचएस सेल), सीएडी- पुलगाव, ता. देवळी, जि. वर्धा, पिनकोड- 442 303
मुलाखतीची तारीख – दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – स्टेशन मुख्यालय, पुलगाव, ता. देवळी, जि. वर्धा, पिनकोड- ४४२ ३०३
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!