पुणे माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना विविध पदांच्या ११ जागा
माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यासाठी विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ११ जागा
वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, नर्सिंग सहाय्यक, फार्मासिस्ट पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ०९ जुलै २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ECHS CeM, C/O स्टेशन मुख्यालय खडकी, दारूगोळा कारखान्याजवळ, खडकी, पुणे, महाराष्ट्र, पिनकोड- 411003
मुलाखतीची तारीख – दिनांक १७, १८ जुलै २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – स्टेशन मुख्यालय, खडकी, दारूगोळा कारखान्याजवळ, खडकी, पुणे- ३
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!