वैद्यकीय शिक्षण-औषधी द्रव्ये विभागात विविध पदांच्या ११०७ जागा
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय व वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष विभाग (महाराष्ट्र राज्य) यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय वैद्यकीय/ दंत महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील तांत्रिक/ अतांत्रिक (गट-क) सवांर्गातील विविध पदांच्या एकूण ११०७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून त्यासाठी दिनांक १४ जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
विविध पदांच्या एकूण ११०७ जागा
ग्रंथपाल पदांच्या ५ जागा, आहारतज्ञ पदांच्या १८ जागा, वैद्यकीय अधिक्षक (समाजसेवा) पदांच्या १३५ जागा, भौतिकोपचार तज्ञ पदांच्या १७ जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या १८१ जागा, ईसीजी तंत्रज्ञ पदांच्या ८४ जागा, क्ष-किरण तंत्रज्ञ पदांच्या ९४ जागा, सहायक ग्रंथपाल पदांच्या १७ जागा, औषध निर्माता पदांच्या २०७ जागा, दंत तंत्रज्ञ पदांच्या ९ जागा, प्रयोगशाळा सहायक पदांच्या १७० जागा, क्ष-किरण सहायक पदांच्या ३५ जागा, ग्रंथालय सहायक पदांच्या १३ जागा, प्रलेखाकार/ ग्रंथसुचीकार (डॉक्युमेंटालिस्ट)/ कॅटलॉगर पदांच्या ३६ जागा, वाहन चालक पदांच्या ३७ जागा, उच्चश्रेणी लघुलेखक पदांच्या १२ जागा आणि निम्नश्रेणी लघुलेखक पदांच्या ३७ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ जुलै २०२५ (मुदतवाढ) पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!