धुळे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४१ जागा
धुळे महानगरपालिका, धुळे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४१ जागा
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी (अंशकालीन), पीएचएन सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, एएनएम, टीबीएचव्ही, एसटीएस, फिजिशियन (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, नेत्रतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, ईएनटी तज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ मे २०२५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे. (ऑफलाईन)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य टपाल शाखा, धुळे महानगरपालिका, धुळे.
अर्ज शुल्क – उमेदवारास राष्ट्रीयकृष्त बँकेच्या धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) जोडणे बंधनकारक राहील खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरीता रु १५०/- व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु. १००/- रकमेचा राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष अर्ज शुल्क राहील
धनाकर्ष पुढील नावे काढणे– Dhule Municipal Corporation. Dhule Corporation Intregrated Health and Family welfare Society
मुलाखतीची तारीख – दिनांक २८ मे २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – अटल बिहारी वाजपेयी सभागृह, नविन प्रशासकीय इमारत, धुळे महानगरपालिका, धुळे.
उमेदवारानी अर्ज सादर करीताना अर्जा सोबत कागदपत्रांच्या छायांकित प्रत्त स्वाक्षरीसहीत जमा करावे अर्ज स्विकृती नंतर सदर पदांकरीता शासन मागदर्शक सुचनेनुसार मुलाखत न घेता गुणांक अनुभव व उच्च शैक्षणिक अर्हतेनुसार निवड करण्याच्या सुचना आहेत त्यानुसार अर्ज छाननी करुन पात्र उमेदवारांची निवड छाननीअंती करण्यात येईल. त्याबाबतचा तपशील www.dhulecorporation.org संकेतस्थळावर व नोटीस बोर्ड वर प्रदर्शीत करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!