चंद्रपूर येथे ऑक्टोबर महिन्यात खुल्या सैन्य भरती मेळाव्याचे आयोजन

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या भारतीय सैन्यदलातील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील पात्र उमेदवारांसाठी चंद्रपूर येथे सैन्य भरती मेळावा आयोजित करण्यात येत असून यामध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.

विविध पदांसाठी भरती मेळावा
(१) जनरल ड्यूटी (जीडी), (२) तांत्रिक, (३) तांत्रिक (विमानचालन आणि दारूगोळा निरीक्षक), (४) तांत्रिक (नर्सिंग सहाय्यक/ नर्सिंग सहाय्यक पशुवैद्यकीय), (५) लिपिक/ स्टोअर कीपर तांत्रिक/ यादी व्यवस्थापन, (६) ट्रेड्समन (दहावी पास), (७) ट्रेड्समन (आठवी पास), (८) शिपाई (औषधी) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार अनुक्रमे (१) इय्यता दहावी ४५% गुणांसह उत्तीर्ण, (२) इय्यता बारावी ५०% गुणांसह उत्तीर्ण (PCM), (३) इय्यता बारावी ५०% गुणांसह उत्तीर्ण (PCM) किंवा मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ ऑटोमोबाइल/ कॉम्पुटर सायन्स/ इलेक्ट्रॉनिक & इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमाधारक, (४) इय्यता बारावी ५०% गुणांसह उत्तीर्ण (PCM) किंवा B.Sc (Botany/ Zoology/ Bio-Science), (५) इयत्ता बारावी ६०% गुणांसह उत्तीर्ण, (६) इयत्ता दहावी उत्तीर्ण, (७) इय्यता आठवी उत्तीर्ण आणि (८) इयत्ता बारावी उत्तीर्णसह डी.फार्म ५५% गुणांसह किंवा बी.फार्म ५०% गुणांसह उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – जनरल ड्यूटी (जीडी) पदांसाठी उमेदवाराचा जन्म १ ऑक्टोबर १९९८ ते १ एप्रिल २००२ दरम्यान आणि तांत्रिक, ट्रेड्समन पदांसाठी १ ऑक्टोबर १९९६ ते १ एप्रिल २००२ दरम्यान तसेच शिपाई (औषधी) पदांसाठी १ ऑक्टोबर १९९४ ते ३० सप्टेंबर २००२ दरम्यान झालेला असावा.

नोंदणी – दिनांक १३ ऑगस्ट २०१९ ते २६ सप्टेंबर २०१९ दरम्यान ऑनलाईन करणे आवश्यक आहे.

प्रवेशपत्र – दिनांक २७ सप्टेंबर २०१९ पासून १० ऑक्टोबर २०१९ पर्यंत नोंदणीकृत इमेलवर पाठविण्यात येतील.

कालावधी – दिनांक १२ ऑक्टोबर २०१९ ते २३ ऑक्टोबर २०१९ दरम्यान घेण्यात येईल.

ठिकाण – जिल्हा क्रीडा स्टेडियम, चंद्रपूर (महाराष्ट्र)

सूचना – उमेदवारांनी प्रवेश पत्रात नमूद केल्याप्रमाणे निश्चित तारखेस वेळेत मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन नोंदणी

 


Comments are closed.