सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४५०० जागा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India) यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४५०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांकरिता होणाऱ्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी सोबत दिलेली अधिकृत जाहिरात सविस्तर वाचावी अथवा सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे.

अप्रेंटिस पदांच्या एकूण ४५०० जागा

शैक्षणिक पात्रता – प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी (ग्रॅज्युएशन) उत्तीर्ण असणे आवश्यक असून केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या कोणतीही समकक्ष शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या उमेदवारांना अर्ज करता येईल. पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वयोमर्यादा – सदरील पदांसाठी वयोमर्यादा २० ते २८ वर्षांपर्यंत निश्चित करण्यात आली असून दिव्यांग (PWBD) उमेदवारांकरिता ४००/- रुपये, अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती (SC/ST)/ सर्व महिला/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) उमेदवारांकरिता ६००/- रुपये तसेच इतर सर्व उमेदवारांकरिता ८००/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});