ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण ३८९५ जागा

ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३८९५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३८९५ जागा
कुशल कामगार आणि अकुशल कामगार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – कुशल कामगार पदाकरिता दहावी उत्तीर्णसह संबंधित ट्रेड (अभ्यासक्रम) मधून आयटीआय उत्तीर्ण व अकुशल कामगार पदाकरिता उमेदवार किमान इय्यता आठवी उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा – कुशल कामगार पदाकरिता उमेदवाराचे वय १८ ते ४५ वर्ष दरम्यान आणि अकुशल कामगार पदाकरिता १८ ते ५५ वर्ष दरम्यान असावे.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराकरिता ५००/- रुपये तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराकरिता २५०/- रुपये आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कॉर्पोरेट कार्यालय, ब्रॉडकास्ट इंजिनीरिंग कन्सल्टंट्स इंडिया, बी.ई.सी.आय.एल. भवन, सी/17, सेक्टर-62, नोएडा, पिनकोड- 201307 (उत्तर प्रदेश)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ नोव्हेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.