अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत अधिकारी पदांच्या ३५०० जागा
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) यांच्या अधिनस्त असलेल्या विविध राज्यातील आस्थापनेवरील ऑफिसर पदांच्या एकूण ३५०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
ऑफिसर पदांच्या एकूण ३५०० जागा
नर्सिंग ऑफिसर (अधिकारी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार भारतीय नर्सिंग परिषद/ राज्य नर्सिंग परिषद/ विद्यापीठातून बी.एस्सी. (ऑनर्स) नर्सिंग/ बी.एस्सी. नर्सिंग किंवा बी.एस्सी. (पदव्युत्तर पदवी) पदव्युत्तर नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठातून उत्तीर्ण केलेली असावी, तसेच राज्य/ भारतीय नर्सिंग कौन्सिलमध्ये परिचारिका आणि मिडवाईफ म्हणून नोंदणीकृत असावा. (पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.)
वयोमर्यादा – उमेदवारांचे वय दिनांक १८ ऑगस्ट २०२५ रोजी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे १८ ते ३० वर्ष असावे तर अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्ष तसेच इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्ष सवलत.
परीक्षा – दिनांक २५ व २६ ऑगस्ट २०२५ रोजी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येतील.
परीक्षा शुल्क – खुल्या/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३०००/- रुपये तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ आर्थिक मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी २४००/- रुपये आहे तर दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना फीस मध्ये पूर्णपणे सवलत राहील.
परीक्षा – नर्सिंग ऑफिसर भरतीसाठी सामान्य (प्रथम) पात्रता परीक्षा दिनांक १४ सप्टेंबर २०२५ (रविवार) तसेच मुख्य परीक्षा दिनांक २७ सप्टेंबर २०२५ (शनिवार) रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!