एयर इंडिया इंजीनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये केबिन पर्यवेक्षक/ तंत्रज्ञ पदांच्या १२ जागा

एयर इंडिया इंजीनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील केबिन पर्यवेक्षक/ केबिन तंत्रज्ञ पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

केबिन पर्यवेक्षक / तंत्रज्ञ पदांच्या १२ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी किंवा पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह २५,०००/- रुपये मानधन मिळेल.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३५ वर्ष पेक्षा जास्त नसावे. (इतर मागास वर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ३८ वर्ष तसेच अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांकरिता वय ४० वर्षापर्यंत सवलत.

मुलाखतीचा पत्ता – एयर इंडिया इंजीनिअरिंग सर्व्हिसेस, दिल्ली

मुलाखतीची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०१९ रोजी उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.