महाराष्ट्रात लवकरच नवं सरकार स्थापन होईल, यात शंकाच नाही : मुख्यमंत्री

सत्तेच्या समीकरणाच्या संदर्भात कोण काय बोलतं यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. महाराष्ट्राला नव्या सरकारची गरज आहे आणि ते बनेल त्यासाठी आम्ही पूर्ण आश्वस्त आहोत, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते आज दिल्लीत असून तेथे महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

फडणवीस म्हणाले, ‘राज्यात ३२५ तालुक्यात शेतीचं नुकसान झालेलं आहे. अनेक गावांत शेतीचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदतीची आवश्यकता आहे. यासंदर्भातल्या केंद्र सरकारच्या समितीचे अध्यक्ष गृहमंत्री असतात. त्यामुळे मी अमित शहांची भेट घेतली.’ (संपूर्ण बातमी वाचा)

 


Comments are closed.