अहिल्यानगर जिल्ह्यात महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या १७५ जागा
अहिल्यानगर जिल्ह्यातील अहिल्यानगर, कर्जत, कोपरगाव , जामखेड, नेवासा, पाथर्डी, पारनेर, राहाता, राहुरी, शेवगाव, श्रीगोंदा, श्रीरामपूर आणि संगमनेर तालुक्यातील विविध सजेतील महसूल सेवक (कोतवाल) या संवर्गातील पदांच्या १७५ जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
कोतवाल पदांच्या एकूण १७५ जागा
महसूल सेवक (कोतवाल) पदांच्या अहिल्यानगर- २४ जागा, कर्जत- १४ जागा, कोपरगाव- १२ जागा, जामखेड- ६ जागा, नेवासा- १६ जागा, पाथर्डी- १३ जागा, पारनेर- २१ जागा, राहाता- ७ जागा, राहुरी- ११ जागा, शेवगाव- ७ जागा, श्रीगोंदा- २० जागा, श्रीरामपूर- ८ जागा आणि संगमनेर तालुक्यातील १६ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इय्यता ४ थी परीक्षा उत्तीर्ण आणि संबंधित सजातील अंतर्भूत असलेल्या गावचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक १८ जुलै २०२५ पर्यंत केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!