केवळ तीन फूट उंची असलेली आरती डोगरा अजमेरची जिल्हाधिकारी …!
आपल्याकडे समाजात असे बरेच वर्ग आहेत जे मुलींना कमकुवत मानतात आणि शारीरिकरित्या अपंग राहिल्यास त्यांना तिरस्काराने पाहण्यास सुरुवात करतात. मात्र माजाचे टोमणे खाऊन आयएएस अधिकारी झालेल्या आरती डोगरा हिने शारीरिक आव्हान असताना समाजातील टोमणे खाल्ले, पचवले आणि एक दिवस इतकी मोठी झाली की तिने सर्वांचे तोंड कायमचे बंद केले आहे. आज त्यांची राजस्थानात अजमेरचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे
फक्त ३ फूट ६ इंच उंची असलेल्या आरती डोगरा आज राजस्थान केडरची आयएएस अधिकारी आहे. आरती जरी शरीराने लहान असू शकते परंतु आज ती देशभरातील महिला आयएएसच्या प्रशासकीय वर्गामध्ये एक उदाहरण म्हणून उदयास आली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आवडलेल्या समाजिक परिवर्तनासाठी त्यांनी अनेक मॉडेल्स सादर केल्या आहेत.
उत्तराखंडच्या देहराडून येथे जन्म झालेली आरती २००६ बॅचची आयएएस अधिकारी आहे. कमी उंची असल्याने त्यांना लहानपणापासूनच शारीरिक भेदभावाशी सामना करावा लागला. लोक तिच्या आईवडिलांना म्हणायाचे की अशी मुलगी एक ओझे आहे, आपण तिला का ठार मारून टाकत नाही? तुम्ही समाजात अशी माणसे पाहिली असतील जे स्वत: काहीही करण्यास सक्षम नाहीत परंतु जर इतरांना हसण्याची गोष्ट असेल तर त्यामध्ये काही कमी पडत नाहीत. आरतीबाबतही असेच घडले. समाजातील लोक तीच्यावर हसले, तीची खिल्ली उडवली आणि अगदी काही लोकांनी आई-वडिलांना सांगितले की ही मुलगी एक ओझे आहे, आपण तिला मारण्यापेक्षा तिची काळजी का घेत आहात, परंतु या सर्व गोष्टींपेक्षा आरतीचे पालक आपल्या बाळाची खूप काळजी घेत. त्यानी आपल्या मुलीला शिकवले आणि सक्षम केले की ती आज आयएएस अधिकारी बनली आहे.
आरतीने आपल्या कार्यकाळात उत्तम कामगिरी केली आहे. सध्या त्यांची राजस्थानमधील अजमेरच्या नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. या अगोदर तिने एसडीएम अजमेर या पदावरही पोस्ट केले गेले आहे. याचबरोबर राजस्थानच्या बीकानेर आणि बूंदी जिल्ह्यातही त्यांनी जिल्हाधिकारीपदाची धुरा सांभाळली आहे.
जोधपूर डिस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्त होणारी आरती ही पहिली महिला आयएएस अधिकारी होत्या हे विशेष…
Comments are closed.