कोरोना वुहान प्रयोगशाळेच तयार झाल्याचा वैज्ञानिकाचा धक्कादायक दावा

कोरोना व्हायरसमुळे जगभरात थैमान माजलं आहे. 200हून अधिक देश या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. जगभरात कोरोनावरील लस शोधण्याचं काम अनेक वैज्ञानिक करत आहेत. परंतु काही सवाल आजही कायम आहेत की, कोरोना व्हायरस आला कुठून? त्याची उत्पत्ती कशी झाली? अनेक देशांनी चीनवर याचा आरोप लावला आहे. परंतु चीनकडून हे आरोप नाकारण्यात येत आहेत. आता नोबेल पुरस्कार विजेते वैज्ञानिक यांनी एक आश्चर्यकारक दावा केला आहे. त्यांनी कोरोना व्हायरस वुहानच्या लॅबमधून पसरला असल्याचा दावा केला आहे.

2008 मध्ये नोबेल पुरस्कार जिंकणारे फ्रान्सचे वायरोलॉजिस्ट लूक मॉटेंग्नियर (luc montagnier)  यांनी, चीनमधील प्रयोगशाळेत एड्सवरील लस बनवण्याच्या प्रयत्नांतून कोविड-19चा जन्म झाला असल्याचं सांगितलं आहे. लूक यांच्या या दाव्यानंतर संपूर्ण जगातील विज्ञान आणि राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

 

संपूर्ण बातमी वाचा


Comments are closed.