लोकसेवा आयोगामार्फत न्यायाधीश/ न्यायदंडाधिकारी पदांच्या एकूण ७४ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) पदांच्या एकूण ७४ जागा भरण्यासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – नवीन विधी पदवीधर असणाऱ्या उमेदवाराकडे किमान ५५% गुणांसह विधी पदवी (एल.एल.बी.) किंवा विधी पदव्युत्तर पदवी (एल.एल.एम.) किंवा समतुल्य अर्हता तसेच वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता असणाऱ्या उमेदवाराकडे विधी पदवी (एल.एल.बी.) आणि ३ वर्षे अनुभव व सेवा कर्मचारी असणाऱ्या उमेदवाराकडे विधी पदवी (एल.एल.बी.) आणि ३ वर्ष अनुभव असावा.

वयोमर्यादा – दिनांक १ जानेवारी २०२० रोजी नवीन विधी पदवीधर असणाऱ्या उमेदवाराचे वय २१ ते २५ वर्ष आणि वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता असणाऱ्या उमेदवाराचे वय २१ ते ३५ वर्ष तसेच सेवा कर्मचारी असणाऱ्या उमेदवाराचे वय २१ ते ४५ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष सवलत.)

परीक्षा फीस – अमागास उमेदवारांसाठी ३७४/- रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी २७४/- रुपये आहे.

परीक्षा – दिनांक १ मार्च २०२० रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येईल.

परीक्षा केंद्र – औरंगाबाद, मुंबई आणि नागपूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ जानेवारी २०२० आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

डाऊनलोड NMK ऍप

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.